Tuesday, February 24, 2009

Puneri patya

Aamhi Marathi

Sath nehami deshil ka? - Ek Apratim Kavita

Googly

गेल्या आठवड्यापासून मेली माझी दाढ दुखू लागली आणि आयुष्यात पहिल्यांदा मी दाताच्या डॉक्टरची पायरी चढले. रिसेप्शनमध्ये बसले होते, तर सहज नजर डॉक्टरांच्या डिग-यांच्या सटिर्फिकेटांवर गेली. त्यांचं पूर्ण नाव वाचून मी तर गारच पडले. नंदकिशोर प्रधान... म्हणजे आमच्या शाळेतल्या वर्गाचा हीरो. गोरा गोरा, उंचापुरा, कुरळ्या केसांचा राजबिंडा मुलगा. आता खोटं कशाला सांगू, माझ्यासकट त्या वर्गातली प्रत्येक मुलगी मरत होती नंदूवर. या वयात छातीची धडधड वाढलीच माझ्या...

... आत गेले आणि नंदूला पाहून चाटच पडले. डोक्यावरचे केस मागे हटले होते. लहानपणचे गोबरे गाल आता फुगून गोल गोल झाले होते. पोट सुटलं होतं. निळे डोळे चष्म्याआड झाकले गेले होते. तरीही त्याचा रूबाब कायम होता.

त्याने मात्र मला ओळखलं नव्हतं. तपासणी झाल्यावर मीच त्याला विचारलं, 'लहानपणी तुम्ही आपटे प्रशालेत होतात का?'

' हो.''

' दहावी कधी झालात? सिक्स्टी सिक्सला का?'

' अगदी बरोबर! पण, तुम्हाला कसं कळलं?'

' अहो, तुम्ही माझ्या वर्गात होतात,' सांगताना मी चक्क लाजलेच...

... तर तो टकल्या, ढापण्या, ढोल्या, थेरडा नंद्या विचारतो कसा, 'कोणता विषय शिकवायचात तुम्ही मॅडम!!!'

MAITRI HI HAVICH....

Monday, February 23, 2009

Prem Karayache rahunch gele

Kharolya.............

एक छानशी गोष्ट

एक छानशी गोष्ट
एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा . दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना. शेवटी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते आपल्या मानसपित्याकडे- ब्र्म्हदेवाकडे गेले. ब्र्म्हदेवाने त्यांना सांगितले, "ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही ज्याचे पाय जमिनीवर आसतील, त्याचा भविष्या घडविण्यात निर्णायक सहभाग असतो". दोघेही परत आले. स्वप्नाने आधी प्रयत्न केला. एकच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपसुन केंव्हाच उचलले गेले होते. सत्याने नंतर प्रयत्न केला. त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोचु शकले नाहीत. दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होउ शकले नाही. थकुन परत एकदा ते ब्रम्हदेवाकडे गेले, आणि या वेळेस ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, "भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असअतो. खर्‍या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल, तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे रहयला हवे!."

Saturday, February 21, 2009

आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं

गंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं."

गंध आवडला फुलाचा म्हणून ...फूल मागायचं नसतं,
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....!

परक्यांपेक्षा आपलीच माणसं आपल्याला नेहमी दगा देतात,
एकमेकांच्या पाठीवर मग् नजरे आडून वार होतात,
भळभळणा-या जखमेतून विश्वास घाताचं रक्त वाहतं,
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा आपणच पुसायचं असतं,
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....!

आपलं सुःख पाहण्याचा तसा प्रत्येकाला अधिकार आहे,
पण्; दुस-याला मारुन जगणं हा कुठला न्याय आहे,
माणूस म्हणुन माणसावर खरं प्रेम करायचं,
आपल्या साठी थोडं,थोडं दुस-यासाठी जगायचं,
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं,
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....!

आपल्याला कोणी आवडणं हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं,
आकर्षणाचं स्वप्नं ते आकर्षणंच असतं,
मान्य आहे,आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं,
पण् जे चकाकतं ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं,
मन् आपलं वेडं असतं वेडं आपण व्हायचं नसतं,
मन मारुन जगण्यापेक्षावेळीच त्याला आवरायचं,
अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....!

Bharat mage ka????

Zakas Marathi Lavani