आठवणींनी व्याकूळ मनतुझ्या मिठीत सुखावलेकसे सांगू किती सुखया विरहानंतर मिळाले
विरहानंतरच्या सुखाचेकाय करू वर्णननजर मिळता नजरेलाधडधडू लागले मन
लटका राग लटके भांडणसर्व काही गेले विसरूनस्पर्श तुझा होताचझली मने एकरूप
डोळ्यांत डोळे हातात हातकाय वर्णू ती सायंकाळसमुद्रांच्या लाटांसवेपुढे सरू लागला काळ
अचानक भानावर आलेपाहिले, निघण्याची वेळ झालीआता येतील विरहाचे क्षण याची प्रकर्षाने जाणीव झाली
दाटून कंठ आलाडोळे भरून आलेप्रियकरा,तुझा निरोप घेतानामनास फार दुःख झाले
पण विरहाचे ते क्षणखूप महत्त्वाचे असतातपुन्हा भेटण्याच्या आशेने आयुष्याला नवा अर्थ देतात.
Wednesday, June 10, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment